शैक्षणिक कार्यक्रम उल्लेखनीय प्रकल्प

शै. गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचे जादा तास घेऊन त्यांचा अभ्यास घेतला जातो. हा उपक्रम श्री. पाटोळे सर, श्री नरे सर यांनी राबवला.

इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी मार्गदर्शन, व्याख्याने, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे इ. उपक्रम दरवर्षी राबवितो.

कवी, लेखक आपल्या भेटीला इ. कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.

मुलांच्या भाषिक प्रगतीसाठी निबंध लेखन, काव्यलेखन, हस्ताक्षर स्पर्धा, काव्यवाचन इ. स्पर्धांचे आयोजन केले जाते.

विविध विषयांच्या अंतर्गत मुलांकडून प्रकल्प करून घेतले जातात.

इंग्रजी, मराठी विषयांची गोडी वाढविण्यासाठी नाट्यवाचन, इंग्रजी संभाषण स्पर्धा यात विद्यार्थी भाग घेतात विविध भाषा दिन शाळेत साजरे केले जातात.

इ. ५ वी  ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते. हा उपक्रम श्री. रंजन सरश्री. पाटोळे सरश्री. नाईक शिक्षक राबवतात.