Shubhada Kurde

Principal, AVMMPPS

अभिनव म्हणजे……………
धमाल गंमत सुरेल गाणी
नृत्य, अभिनय सुरेख वाणी
श्लोक, प्राथना, बडबडगाणी
एकाग्र होऊन ऐकू या कहाणी
कथा, कविता अन मनसोक्त खेळणं
हसत, खेळत शिक्षण घेणं
सर्वांगीण विकासाची पर्वणी साधणं
यावर अभिनवचे शिक्षण आधारित आहे.

अशी पद्धती – नेई ध्येयाप्रति – ठळक वैशिष्ट्ये

विशेष उल्लेखनिय यश कामगिरी, स्पर्धा

 • हस्त खेळत शास्त्रीय पद्धतीनुसार संस्कारक्षम शिक्षण
 • शिशुरंजन आणि पूर्व प्राथमिकपर्यंत २० / २५ मुलांना एक शिक्षिका
 • सर्व शिक्षिका प्रशिक्षित
 • मानसशास्त्रीय दृष्ट्या मुलांच्या विकासाचा क्रमवार विचार
 • नृत्य, नाट्य, अभिनय, कलाविष्कार यात तज्ज्ञ असलेला शिक्षकवर्ग
 • विविधांगी नैपुण्य कार्यक्रमात शाळा कायमच आघाडीवर
 • स्वयंशिक्षण, स्वयंमूल्यमापन, स्वयंशिस्त, स्वावलंबन, स्वयंस्पर्धा, स्वच्छता इत्यादी तत्वानुसार मुलांच्या भावनिक, सामाजिक असा सर्वांगीण विकासाचा ध्यास
 • शिशुरंजनपासून इंग्रजी विषयाचा परिचय व शिशुगटापासून इंग्रजी शिकविण्यास सुरुवात.
 • बाल गटापासून इंग्रजी संभाषणाची प्राथमिक सुरुवात आणि संस्कृत विषयाचा परिचय
 • दृकश्राव्य माध्यमातून शाळेने तयार केलेल्या सी. डी. द्वारे शिक्षण
 • धिटाई, निर्णयाशक्ती, निश्चय, मैत्री, खिलाडूवृत्ती, जिद्द, नवनिर्मिती, कलास्वाद, सामाजिक जाणीव इ. गुंवाधीसाठी प्रयत्न
 • प्राथमिक पासून संगणक शिक्षक आणि इ. १ली पासून सेमी इंग्रजीची सुविधा.
 • संगीत खोली – संगीत साधनांचा वापर करून मुलांचा नियमित संगीताचा तास.
 • खेळाची साधने – घसरगुंड्या, सायकली, झोपाळे, साहसी खेळ
 • शालेय दैनंदिनी – मुलांना वाचण्यायोग्य अशा चित्रांचा व खुणांचा उपयोग करून वर्षभराचे नियोजन असलेली दिनदर्शिका आणि अभ्यासक्रमाची रूपरेषा असलेले नियोजन पुस्तक, शिक्षकांसाठी अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन असलेले वेळापत्रक
 • पालकासाठी तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने
 • आजी – आजोबा संमेलन
 • पालकासाठी आणि मुलांसाठी संस्थेने पालकांच्या मदतीने चालवलेले विनामुल्य ग्रंथालय.
 • अनेक वर्ष सरदार किराड ट्रस्ट, नाथ पै संस्कार केंद्र, गुरुकुल, वृंदा-वन कला प्रतिष्ठान, सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन, महेश विद्यालय आयोजित अंतर शालेय पातळीवर अभिनय गीत, नृत्य, तालनृत्य, समूहगीत, समूहगायन इ. स्पर्धांमध्ये शाळेचा सहभाग आणि पारितोषिके प्राप्त. ट्री पब्लिक फाउंडेशन तर्फे होणाऱ्या अंतर शालेय नृत्य नाट्य स्पर्धेत मुख्याध्यापिका विद्या साताळकर लिखित संगीतकेस सलग तीन वर्ष पारितोषिक प्राप्त. पुणे आकाशवाणी बालोद्यान मध्ये शाळेतील मुलांचा अनेक वर्षापासून सहभाग.
 • २०१६ -१७ या शैक्षणिक वर्षात ‘पुस्तक वाचा नक्की समजेल’ – मुख्याध्यापिका विद्या साताळकर लिखित संगितिकेचे पुणे आकाशवाणी बालोद्यान मध्ये मुलांचे उत्तम सादरीकरण.
 • मुख्याध्यापिका – विद्या साताळकर – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा पुरस्कार, बालकथा, लेखन पुरस्कार
 • उपमुख्याध्यापिका – वर्षा पाठक – गुणवंत शिक्षक पुरस्कार, गुरुकुल पुरस्कार
 • शिक्षिका – लीना जोगळेकर – आंतरशालेय बालकथा लेखन स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त
 • मिताली फडके – आंतरशालेय बाल अभिनय गीत स्पर्धा अनेक वेळा    पारितोषिक प्राप्त
 • सुप्रिया कुलकर्णी – आंतरशालेय बाल अभिनय गीत स्पर्धा पारितोषिक प्राप्त

संस्कार शिदोरी

 • मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो / तरी माझ्या भारत देशाचा अभिमान बाळगेन.
 • वाढदिवसाला दिव्याची ज्योत विझविणार नाही, तर त्या दिवशी मी एक झाड लावेन आणि त्या झाडाला वाढवेन.
 • अन्नाचा अनादर करणार नाही आणि सकस अन्नाचा आग्रह धरेन.
 • वीज, पाणी वाया जाऊ देणार नाही.
 • माझ्या वाट्याला आलेले काम उत्तम करण्याचा प्रयत्न करेन आणि काम करताना योग्य मार्गाचाच वापर करेन.
 • मोठ्यांशी आदराने वागेन.
 • रस्त्यावर कचरा टाकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही.
 • वाहतुकीचे नियम पाळेन.
 • मी इतर भाषांचा जरूर आदर करेन पण मराठी भाषा येणाऱ्या व्यक्तीशी माझ्या मातृभाषेतून- मराठीतूनच बोलेन.
 • रोज थोडेतरी अवांतर वाचन करेन.
 • टीव्ही जास्त वेळ पाहणार नाही.
 • मी चांगल्या गोष्टींना चांगले म्हणेन.
 • चांगल्या गोष्टींमध्ये रस घेईन.
 • मी गरजू व्यक्तीना सदैव मदत करीन.
 • कामासाठी ज्या क्षेत्राची निवड करेन त्याच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करेन.