शैक्षणिक कार्यक्रम उल्लेखनीय उपक्रम

सांस्कृतिक उपक्रम

विविध शैक्षणिक साधने, मनोरंजक, रचनात्मक खेळ, हस्तव्यवसाय, व्याकरण खेळ, विविध भाषिक कोड्यांमधून शब्द ओळख, बौद्धिक साधने, गणिती खेळ, गप्पा, गोष्टी, बडबडगीते, अभिनय गीते तसेच विविध उपक्रम, शक्य तिथे प्रत्यक्ष अनुभव देणे यांमधून मुलांचे हसत खेळत सहज शिक्षण होते.

निसर्गपूजा

मुलांवरती पर्यावरणाचे संस्कार होण्यासाठी वटपौर्णिमा मुलांपुढे रोप लावणे, बी पेरणे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. मुलांना घरी रोप लावण्यास सांगितले जाते. ते वाढवलेले रोप मुले ऑगस्ट महिन्यात निसर्ग पूजेला शाळेत आणतात. शाळेत जंगल, वाळवंट, समुद्र, आकाश, डोंगर, इंद्रधनुष्य, बर्फ असलेला हिमालय पर्वत, दिवसरात्रीचे चक्र इत्यादी निसर्गातील रूपांच्या प्रतिकृती केल्या जातात. सूर्याला अर्ध्य दिले जाते. मुलांकडून पर्यावरणाची शपथ घेतली जाते.

विज्ञान त्रिदल, विज्ञान दिंडी

विज्ञान त्रिदल – तीन दिवस मुले विज्ञानाच्या वातावरणात रमतात हायस्कूल प्रयोगशाळेला भेट देतात. मुले स्वत: प्रयोग करून दाखवतात. वैज्ञानिक घोषणा – फलक हातात घेऊन विज्ञान दिंडी काढण्यात येते.

निवडणूक  – खऱ्या निवडणूकी प्रमाणे फलक, प्रचार फेऱ्या, निवडणूक चिन्ह, पोलीस, निवडणूक अधिकारी, मतपेट्या असे वातावरण शाळेत असते आणि मुले आपला आवडता गुणी मित्र किंवा मैत्रिण प्रतिनिधी म्हणून निवडतात.

बाजार –दुकाने मांडून मुलांना बाजारातील वस्तू विकण्याचा व विकत घेण्याचा आनंद दिला जातो.

भातुकली – मुलांच्या सुप्त भावना कळून येण्यासाठी आणि भावनिक विकास होण्यासाठी नियमितपणे भातुकली खेळायला दिली जाते.

भाजी – भाकरी उपक्रम – ( मुलांकडून) निवडणे भाजी करून भाकरी सोबत खायला दिली जाते.

वाहतूक नियम पालन फेरी – वाहतुकीचे नियम चार भिंतींच्या आत न शिकवता प्रत्यक्ष   रस्त्यावर मुलांना नेले जाते आणि तेथे शिक्षण दिले जाते.

बँक, ए. टी. एम. संगणक प्रयोगशाळा मुलांना दाखविली जाते.

स्वावलंबन उपक्रम – ( बटाटा भाजी करणे) मुले स्वत: उकडलेले बटाटे सोलणे, दाणे पाखडणे, कुटणे, कोथिंबीर निवडणे इ. कृती स्वत: करतात आणि गॅसचा वापर न करता बटाटा भाजी करतात.

योगासन – एकाग्रता आणि निरोगी स्वास्थ्यासाठी रोज नियमितपणे मोठ्या गटातील मुलांची शाळेत योगासने करून घेतली जातात.

 • चित्रहंडी
 • आजी आजोबा दिन
 • पालखी – दिंडी सोहळा
 • गुरुपौर्णिमा लो. टिळक पुण्यतिथी निमित्त सर्व मुलांचे कथाकथन
 • गणेशोत्सव – प्रत्येक मुलाचे स्वतंत्रपणे विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण
 • शिक्षक दिन
 • बालदिन (फॅन्सी ड्रेस)
 • मातृदिन आईसाठी मुलांकडून गजरा करून घेतो
 • भोंडला
 • दसरा (पातीपुजन)
 • कोजागरी ( मुलांना रात्री बागेत किंवा टेकडीवर नेतो)
 • दिवाळी ( मुलांकडून आकाश कंदिल, भेटकार्ड करून घेतो तसेच मुले पणत्या रंगवतात)
 • नाताळ दिन
 • १५ ऑगस्ट स्वातंत्र
 • २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

विशेष उपक्रम

 • पर्यावरण संस्कार होण्यासाठी आणि निसर्गाचे शिक्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नाविन्यपूर्ण निसर्गसहल दरवर्षी आयोजित केली जाते. त्याची पूर्व तयारी म्हणून शाळेत शेणखतयुक्त मातीत बी घालून मुले बियांचे चेंडू (Seed ball) तयार करतात आणि ते चेंडू पानशेत परिसरातील विद्या विहार पर्यावरण प्रकल्प येथे जाऊन दरीत टाकतात.
 • गमभन प्रकाशनच्या दिनदर्शिकेच्या एका पानावर मोठ्या गटातील सर्व मुलांकडून शाळेत चित्र काढून घेतले जाते. प्रत्येक मुलाचे चित्र बालगंधर्व कलादालनात चित्र प्रदर्शनात लावले जाते.
 • तीन वर्ष मुलांमध्ये ज्या – ज्या गोष्टी रुजविल्या जातात त्या सर्व गोष्टींचे संकलन करून तयार केलेली संस्कार शिदोरी १ लीत जाताना दिली जाते.