ध्येय, उद्दिष्ट्ये, धोरण

मराठी शाळेमध्ये मुलांची संख्या वाढावी हे मुख्य उद्दिष्ट्य. ते पूर्ण करण्यासाठी मुलांचा

सर्वांगीण विकास होईल अशा तऱ्हेने उपक्रम राबवतो जेणेकरून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढून मुले स्वयंस्फूर्तीने तयार होतील

मुख्याध्यापिकांचे मनोगत

तसेच जीवनव्यवहार, भाषा, गणित, इंद्रिय, विज्ञान, रचनात्मक खेळ, बौद्धिक खेळ, मुक्ताव्यवसाय, शैक्षणिक सी.डो. पपेट शो स्लाईड शो विज्ञान प्रयोग परिचय पाठ या विषयांच्या माध्यमाद्वारे मुलांना शिकवले जाते तसेच दरमहिन्याला निरनिराळे क्षेत्रांतील वक्ते बोलावून पालकसभेमध्ये पालकांचे प्रबोधन केले जाते पालकांच्या स्पर्धा घेतल्या जातात अशी आमची आदर्श विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा जो येथे प्रवेश घेईल तो जगात चमकेल

आशा तऱ्हेने मॉंटेसरी शाळेत वर्षभर विविध उपक्रमांद्वारे मुलांचे हसत- खेळत, गाणी-गोष्टी, खेळ, बडबडगीतांच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण घेतले जाते

मुख्याध्यापिका

सुनंदा पांडे

शाळेची वैशिष्टये

  • माफक फी
  • देणगी नाही
  • डिपॉझिट नाही
  • गणवेश, पाटी – पेन्सिल शाळेतून.
  • क्रीडांगण व खेळाच्या सोयी.
  • रोज शाळेतून पौष्टिक आहार
  • प्रयोगशाळा: विज्ञानाचे प्रयोग सर्व गटांसाठी घेतो.
  • ग्रंथालय: चित्रांची व गोष्टींची खूप पुस्तके आहेत. ती वाचून दाखविली जातात. चित्रावरून गोष्ट सांगितली जाते.
  • खेळाची साधने: घसरगुंड्या, सीसॉ, झोपाळे, तीन चाकी सायकल्स, सॅण्ड -पीट, बाहुल्या, दंडा पेट्टी, रंगीत मनोरे, उंच व रुंद शिडी इ.
  • संगीत खोली. रोज अर्धा ते पाऊण तास पेटीवर गाणी घेतली जातात.
  • वर्षातील महत्वाचे दिवस
  • 15 ऑगस्ट ( स्वतंत्र दिन )
  • 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
  • थोर पुरुषांचे जन्मदिन व पुण्यतिथी
  • वार्षिक स्नेहसंमेलन
  • शालेय क्रीडा स्पर्धा
  • शैक्षणिक सहल
  • सांस्कृतिक कार्यक्रम
  • विज्ञान प्रदर्शन
  • मराठी दिन
  • प्रवेश संबंधित सूचना
  • अडीच ते साडे पाच खेळगट, शिशुगट, बालगट प्रवेश घेण्यासाठी अडीच ते साडे तीन- खेळगट, साडे तीन- ते साडे चार शिशुगट, साडे चार – ते साडे पाच बालगट,