शैक्षणिक विशेष बाबी

 

  • जर्मन भाषा अध्यापनाची उत्तम सोय.अनेक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जर्मनीमध्ये जाऊन अध्ययनाची संधी.
  • इ. ५ वी ते ७ वी पर्यंत स्पोकन इंग्लिश अध्यापनाची दर्जेदार सुविधा.
  • डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, इन्स्पायर अवॉर्ड, इंग्लिश ऑलिम्पियाड, भूगोल-इतिहास प्रज्ञा शोध परीक्षा, एन. टी. एस., परीक्षांची सुविधा.
  • नासा अंतराळ संशोधन संस्था (अमेरिका) येथून प्रशिक्षण घेऊन आलेल्या ३ विज्ञान शिक्षिकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
  • प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनाची सुविधा.
  • टॅब, ई-लर्निंगच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अध्यापनाचा प्रयत्न.
  • स्पर्धा परीक्षा पद्धतीचा सराव व्हावा यासाठी सर्व विषयांच्या ऑनलाइन परीक्षांचे आयोजन.

 

विशेष उपक्रम :-

  • नाट्य प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन. विविध नाट्य स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी.
  • स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमात सातत्याने सहभाग व उत्तम यश.
  • कबड्डी, टेनिस, बुद्धीबळ इ. क्रीडाप्रकारांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर उपक्रम.
  • आरोग्य, वाहतूक, व्यवसाय याबाबतीत विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन.
  • विविध सामाजिक उपक्रमात शाळेचा सक्रीय सहभाग.

उदा. अंध विद्यार्थिनी लेखनिक प्रकल्प, स्वच्छतेविषयक, पर्यावरण विषयक सामाजिक जागृती इत्यादी.