About Us

आमचे ध्येय, कार्य कर्म समाचर… या भगवदगीतेतील श्लोकाच्या शिकवणीनुसार कार्य हेच कर्म समजून ज्ञानादानाच्या  पवित्र कार्यात सहभागी होणे.

  • समाजसेवा श्रम संस्कार शिबिर
  • रस्ता सुरक्षा पथकाच्या माध्यमातून वाहतूक सुरक्षितता उपक्रम.
  • शालेय परिसर स्वच्छता मोहिम.
  • संगणकाच्या साहाय्याने विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक.
  • वनराई पर्यावरण संस्थेच्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग.
  • गणेशोत्सव काळात पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभाग.
  • रायफल शुटींग, लॉन टेनिस, कबड्डी, तायक्कांदो, जलतरण इ. क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. अनेक विद्यार्थी उच्च पातळीवर चमकलेले आहेत. पूर्वा बर्वे – बॅडमिंटन अनुया व अनन्या थोरात भगिनी – लॉन टेनिस मध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करत आहेत.

संग्राम माने – रायफल शुटींग मध्ये चमकदार कामगिरी करीत आहे. मंगेश भगत – राष्ट्रीय कबड्डी मध्ये सहभागी.. शिवछत्रपती पुरस्कार मिळविला आहे.

शीतल महाजन :- पॅराजम्पींग मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे.

विद्यमान आमदार सौ. मेधाताई कुलकर्णी :- माजी विद्यार्थीनी व माजी शिक्षिका.

प्रशालेतील प्रवेश प्रक्रिया वर्षाच्या मे महिन्यात सुरू होते. प्रामुख्याने इ. ५वी मध्ये प्रवेश दिले जातात. इतर वर्गातील उपलब्धतेनुसार प्रवेश दिले जातात. सेमी इंग्लिश माध्यमातून अध्यापनाची विशेष सुविधा उपलब्ध आहे. आदर्श शिक्षण मंडळीच्या प्राथमिक शाळेतून इ. ४ थी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन रिक्त राहिलेल्या जागांवर इ. ५ वी मध्ये प्रवेश दिले जातात. प्रवेशासाठी कोणतीही देणगी, प्रवेश परीक्षा, मुलाखत घेतली जात नाही.

पुण्यात मराठी माध्यमाची प्रथितयश शाळा म्हणून आमच्या प्रशालेचा उल्लेख केला जातो. अ स्कूल विथ अ डिफरन्स हे ध्येयवाक्य घेऊन गेली अनेक वर्षे अभिनव वाटचाल करीत आहे. उत्तम इंग्रजी शिकविणारी मराठी माध्यमाची शाळा अशीही अभिनवची ओळख आहे. स्पोकन इंग्लिश, जर्मन भाषा अध्यापनाची विशेष सोय, नाट्य-सिने क्षेत्रात कामगिरीसाठी उपयुक्त ठरणारे सांस्कृतिक उपक्रम, उत्तम क्रीडा मार्गदर्शन इ. अनेक घटकांमुळे अभिनव सातत्याने प्रगतीपथावर अग्रेसर आहे. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावाखाली शिक्षणक्षेत्र असतानाही अभिनव मराठी शाळा आपले अढळ स्थान टिकवून आहे. आदर्श शिक्षण मंडळीच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली शाळा भविष्याचा वेध घेऊन वाटचाल करीत आहे.

मुख्याध्यापकांचे मनोगत

मुख्याध्यापकांचे मनोगत

पुण्याच्या शैक्षणिक क्षितिजावर मराठी माध्यमाची उत्तम शाळा म्हणून अभिनवची ओळख असून ही ओळख आणखीन दृढ करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आम्ही करत असतो. जागतिकीकरणात विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी यशस्वीरित्या टिकून राहावेत या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना सर्वांगिण पातळीवर सक्षम करण्यासाठी विवध उपक्रम. उदा. स्वच्छ सुंदर शाळा योजना, ई-स्कूल, संगणक प्रशिक्षण, पर्यावरण संवर्धन, नाट्य-कला-चित्रकला प्रशिक्षण इ. बहुविध अभिनव उपक्रम.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, शिस्त, देशप्रेम, सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न. अभिनवच्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमात आदर्श शिक्षण मंडळीच्या सर्व पदाधिकार्यांचे मार्गदर्शन व मदत लाभत असते. अभिनवच्या सुशिक्षित पालकवर्गाचेही उत्तम सहकार्य सातत्याने मिळत असते. या सर्वांच्या प्रयत्नांतून अभिनवची वाटचाल अधिक जोमाने सुरु आहे.