About Us

आपल्या घटक संस्थेविषयी

आमचे ध्येय, उद्दिष्ट्ये आणि धोरण –

१) परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणे.

२) विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवून उत्तम नागरिक बनविणे.

आमचे बोधवाक्य – सर्वांना शिक्षण उत्तम शिक्षण.

विविध उपक्रम

सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, बाजार पालकांसाठी हळदीकुंकू, क्रीडा स्पर्धा. वार्षिक स्नेहसंमेलन

मुख्याध्यापकांचे मनोगत

या शाळेत येणारे विद्यार्थी हे गरीब व कष्टकरी घरातून आलेले असतात. आई -वडिलांना त्यांचा अभ्यास कसा घ्यावा हेही समजत नाही फक्त मुलांना

शाळेत पाठवणे एवढेच कळते. मुलांचा सर्वांगीण विकास हा या शाळेतील शिक्षिकेलाच करावा लागतो.

या शाळेतील शिक्षिका प्रत्येक  विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देत असतात. मुलांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतात.

वाचन, लेखन याकडे सतत लक्ष देऊन पालकांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करत असतात. अभ्यासाबरोबर इतर स्पर्धा, खेळ यामध्ये

मुलांना भाग घेण्यास प्रवृत्त करून त्याचा सरावही करून घेतात. हुशार व होतकरू मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले जाते. अशा प्रकारे संपूर्ण

मुलांच्या गुणवत्तेसाठीच सर्व शिक्षिका राबत असतात. त्यामुळे शाळेचा निकालही चांगला लागतो.