Academics & Facilities
अभिनव विद्यालय प्राथमिक शाळेत ‘मराठी सप्ताह’ जोरदार साजरा.
अभिनव विद्यालय प्राथमिक शाळा (मराठी माध्यम )एरंडवणे पुणे 4, येथे मोठ्या उत्साहाने मराठी सप्ताह साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढीस लागेल अशा विविध उपक्रमांची रेलचेल आठवडाभर करण्यात आली.
महाराष्ट्रीयन सात्विक थाळी उपक्रम, पारंपारिक पोशाख, काव्यवाचन, मराठी साहित्यिकांची ओळख त्याचबरोबर विज्ञान दिन असे विविध उपक्रम साजरे झाले.
पालखी सोहळा
भजन कीर्तनात रंगून जातो , जो विठ्ठलमय होऊन जातो
इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व मुलांनी वारकर्यांचा पोषाख केला होता. दिंडी काढण्यात आली. अभिनव परिसर विठूनामाचा गजराने दुमदुमून गेला होता.
सर्व शिक्षक , विद्यार्थी , सेवक सर्वजण वारीत सहभागी झाले
पालखी सोहळा सर्वांना एकतेचा व सहकार्याने राहण्याचा संदेश देतो
आंतरराष्ट्रीय योगदिन दि.२१/०७/२०१७
सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटू या एकोप्याने जागतिक योगदिनानिमित्त शाळेच्या मुख्या. सोनकांबळे बाई, निरीक्षक शिराळकर बाई, शिक्षक, विद्यार्थी यांनी योगासने, प्राणायम, व्यायाम प्रकार करून योगदिन साजरा करण्यात आला.
योगशिक्षक, श्री. साखरे, कुडले, मालसे, काळूरकर, दुधाने यांनी योगासनासंदर्भात उत्तम मार्गदर्शन केले. आजच्या या धावपळीच्या काळात योगाचे महत्त्व सांगितले.
अभिनयगीत स्पर्धा
मुलांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी आपली शाळा सतत स्पर्धा उपक्रमाचे आयोजन करते. शाळेची पहिली स्पर्धा अभिनयगीत स्पर्धा दि. ०७/०७/२०१७ रोजी घेण्यात आली.
गुरुपौर्णिमा
गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुदैवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:
गुरुपौर्णिमा कार्यक्रम दि. ०८/०७/२०१७ रोजी संपन्न झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. चव्हाण सर शाळेच्या निरीक्षक मा. शिराळकर बाई, माजी मुख्या. मा लांडगे बाई, मा. मुख्या. सोनकांबळे बाई या गुरुजनांच्या समवेत कार्यक्रम संपन्न झाला.
गुरुविण कोण दाखविल वाट. हे सत्य तर आहेच शिक्षकांबरोबरच आमचे गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थिती होते.
या सोहळ्यात MTS, T.M.V. ज्ञानपीठ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा देखील सत्कार मा. चव्हाण सरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ज्या शिक्षकांनी उत्तमरित्या वयाची ५० शी पूर्ण केली आहे. त्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
आपला प्रत्येक विद्यार्थी यशस्वी व्हावा. अभिनवच्या यशाची पताका अशीच उंच राहावी अशी सर्वांना शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेचा आगळावेगळा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.