अभिनव विद्यालय प्रा. (म.मा)
मा. तात्यासाहेब वीरकर व मा. नानासाहेब उपासनी यांच्या स्मृतीस अभिवादन ! आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष मा. श्री. प्र.चिं. शेजवलकर, संस्थेचे कार्याध्यक्ष व शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. वि. ना. चव्हाण, मानद कार्यवाह, श्री. प्रकाश म. जोशीराव व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शालेय कामकाजाचे व्यवस्थापन केले जाते. शालेय कामकाजाची, विविध उपक्रम, स्पर्धांची माहिती आपणांस व्हावी म्हणून शालेय कामकाजाचा अहवाल सादर करीत आहे.
उपक्रम
- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनानुसार विविध उपक्रम गटकार्याचा समावेश विद्यार्थी कृतीमध्ये केला आहे व या पद्धतीने अतिशय समाधानकारक मूल्यमापन केले जात आहे
- १५ जून २०१६ रोजी या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. १६ जून २०१६ रोजी सर्व शिक्षा अभियानातर्फेमोफत पाठ्यपुस्तके योजनेनुसार विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप अभिनव विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्या. सौ. विद्याताई साताळकर व निरीक्षक सौ. लता शिराळकर यांच्या हस्ते झाले.
विशेष उल्लेखनिय यश कामगिरी, स्पर्धा
-
सन २०१५-१६ या वर्षी सानेगुरुजी कथामाला समूहगीत स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.
-
ज्ञानरंजन ग्रंथालया तर्फे इ. ३ री ते ४ थी प्रकट वाचन स्पर्धा घेण्यात आली.
-
सानेगुरुजी कथामाला कथाकथन स्पर्धेमध्ये १२६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला इ. १ ली,२ री मध्ये निषाद महेश साने प्रथम क्रमांक, आनंद मंदार पेंडसे द्वितीय क्रमांक मिळविला. इ. ३ री ते ४ थी मध्ये सानिका जयराम जोशी, प्रथम क्रमांक, गौरांगी ठकसेन कनोजे उत्ते. क्रमांक मिळविला.
-
-
डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या शिक्षक नाट्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. नाटकाचे लेखन मा. निरीक्षक लता शिराळकर यांनी केले. तसेच नाट्यवाचन स्पर्धेत वैशाली नाईक, गीतांजली तांबे, मंगला जोशी, मंगला कटारे व स्वाती वाळके यांनी सहभाग घेतला होता. मंगला जोशी यांना वाचनाचा विशेष पुरस्कार मिळाला. विशेष मार्गदर्शन मा. मुख्या. सौ मीरा लांडगे व मा. निरीक्षक लता शिराळकर यांनी केले.