- पालकांसाठी तिळगुळ समारंभ
- क्रीडास्पर्धेच्या वेळी पालकांसाठी स्पर्धा. — पाककला, रांगोळी, संगीत खुर्ची, शै. साधने बनविणे.
- वर्षातून एकदा सहल
- वर्षातून दोनदा जीवन-व्यवहार (दळणे, कुटणे, वाटणे, पाखडणे, निवडणे, सोलणे, भरणे, वजन करणे, शिवणे, ओवणे इ. सर्व साहित्य आहे.)
- श्रावण महिन्यात शेकोटीला कार्यक्रम
- आरोग्य तपासणी
विशेष उल्लेखनिय यश कामगिरी, स्पर्धा
अनेक वर्ष सरदार किराड ट्रस्ट, नाथ पै संस्कार केंद्र, गुरुकुल, वृंदा-वन कला प्रतिष्ठान, सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन, महेश विद्यालय आयोजित अंतर शालेय पातळीवर अभिनय गीत, नृत्य, तालनृत्य, समूहगीत, समूहगायन इ. स्पर्धांमध्ये शाळेचा सहभाग आणि पारितोषिके प्राप्त.
ट्री पब्लिक फाउंडेशन तर्फे होणाऱ्या अंतर शालेय नृत्य नाट्य स्पर्धेत मुख्याध्यापिका विद्या साताळकर लिखित संगीतकेस सलग तीन वर्ष पारितोषिक प्राप्त. पुणे आकाशवाणी बालोद्यान मध्ये शाळेतील मुलांचा अनेक वर्षापासून सहभाग.
२०१६ -१७ या शैक्षणिक वर्षात ‘पुस्तक वाचा नक्की समजेल’ – मुख्याध्यापिका विद्या साताळकर लिखित संगितिकेचे पुणे आकाशवाणी बालोद्यान मध्ये मुलांचे उत्तम सादरीकरण.