अभिनव विद्यालयात उत्साहात पार पडली उल्लास नवभारत साक्षरता परीक्षा
रविवार दिनांक 29/ 3/ 2026 रोजी अभिनव विद्यालय प्राथमिक शाळा या ठिकाणी केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमातंर्गत परीक्षा घेण्यात आली .यासाठी सर्व पालकांनी उत्साहाने भाग घेतला होता व शिक्षकांनी सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन केले. तसेच शाळेला भेट देण्यासाठी समग्रच्या माननीय रश्मी परदेशी मॅडम आल्या होत्या. परीक्षार्थी एका पालकांनी स्वतः आवडते मज मनापासून शाळा हे गीत गायन करून शाळेविषयी आपली भावना व्यक्त केली. त्याचप्रमाणे एका परीक्षार्थी पालकांनी परीक्षे विषयी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. संगीता सरोदे मॅडम यांनी परीक्षेचे उत्कृष्ट मार्गदर्शन व नियोजन केले अशाप्रकारे सर्व शिक्षकांच्या सहकार्याने परीक्षा आनंदी व उत्साही वातावरणात उत्तम पार पडली.
