About Us
मा. तात्यासाहेब वीरकर व मा. नानासाहेब उपासनी यांच्या स्मृतीस अभिवादन ! आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष मा. श्री. प्र.चिं. शेजवलकर, संस्थेचे कार्याध्यक्ष व शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. वि. ना. चव्हाण, मानद कार्यवाह, श्री. प्रकाश म. जोशीराव व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शालेय कामकाजाचे व्यवस्थापन केले जाते. शालेय कामकाजाची, विविध उपक्रम, स्पर्धांची माहिती आपणांस व्हावी म्हणून शालेय कामकाजाचा अहवाल सादर करीत आहे.
मनोगत
मुलांना संस्कार शील बनवणे. प्रत्यक्ष अनुभव, चिंतन यातून व्यक्तिमत्त्वास आकर येत असतो विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणातून त्यांचा सर्वांगीण विकास करणे. तसेच या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना सक्षम करणे हे आपल्या शाळेचे ध्येय आहे. जेव्हा विकास होतो तेवा बदल हा होणारच शिवाय सृष्टीचा नियमच आहे आणि तो हवाच. मागील वर्षापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करून या स्पर्धेच्या युगात यशाचे पहिले पाऊल टाकले आहे.
शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे आदर्श शक्षण मंडळीचे कार्याध्यक्ष मा.श्री. चव्हाण सर व उत्साही, उत्कृष्ट नेतृत्वशील असणारे मानद कार्यवाह मा.श्री. जोशीराव सर व सर्वच पदाधिकारी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व सहकार्याने आपली शाळा प्रगतीपथावर यशस्वीपणे वाटचाल करत आहे.
या यशाच्या वाटचालीत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचेही सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे.
आपल्या अभिनवच्या याशोगाथाची परंपरा अशीच उंच ठेवणाऱ्याचा प्रयत्न करू या!
“ विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हाच शाळेचा ध्यास”
सौ. सोनकांबळे , मुख्याध्यापिका
स्पर्धा
कार्यशाळा
ज्ञानरंजन ग्रंथालया तर्फे इ. ३ री ते ४ थी प्रकट वाचन स्पर्धा घेण्यात आली.
आंतर शालेय नाट्यवाचन स्पर्धेत आपल्या शाळेचा तृतीय क्रमांक आला. नाटकाचे लेखन मा. निरीक्षक लता शिराळकर यांनी केले. मार्गदर्शन सौ. लता शिराळकर, नाईक व पिसे यांनी केले. विशेष मार्गदर्शन मुख्या. सौ मीरा लांडगे यांनी केले. तसेच नाट्यवाचन स्पर्धेत निशांत लाड, ऋचा हरकरे, सानिका जोशी, तेजल मोरे, रिद्धी देवचके व तन्मय भट या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ऋचा हरकरे या विद्यार्थिनीला उत्कृष्ट वाचनाचे बक्षीस मिळाले.
नवा सिहंगड परिसर सांस्कृतिक कलामंच आयोजित आंतर शालेय समूहगीत स्पर्धेत शाळेला प्रथम क्रमांक मिळाला. मार्गदर्शन संगीत शिक्षिका चांदेकर यांनी केले व तबल्याची साथ माजी विद्यार्थी धनंजय साळुंके यांनी दिली.
सप्तरंग राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत एकूण २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले व इ. १ ली, २री मध्ये कु. ईश्वरी सारंग जोशी हिला छोटा आर्टीस्टची ट्रॉफी मिळाली. तीन विद्यार्थी राज्यात व विभागात आले. अलर्क संदीप बादरायणी इ. ४ थी, ज्ञान गट राज्यात तृतीय, निषाद महेश साने इ.२ री राज्यात उत्ते. तेजल राजेश मोरे इ. ४ थी विभागात प्रथम आले
ट्री फांऊडेशनतर्फे घेण्यात आलेल्या पर्यावरण नाट्य स्पर्धेत आपल्या शाळेचा उत्तेजनार्थ क्रमांक आला. या नाटकाचे लेखन मंगला कटारे यांनी केले. ३४ विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. नाट्यदिग्दर्शन मंगला कटारे नेहा उत्तेकर माधवी चांदेकर यांनी केले. तबल्याची साथ धनंजय साळुंके यांनी दिली. विशेष मार्गदर्शन मुख्या. सौ मीरा लांडगे यांनी केले.
पुणे जिल्हा मल्लखांब अजिंक्यपद व निवड स्पर्धेत आपल्या शाळेतील ची. आयुष विनायक उभे इ. ४ थी यश गट यात मुलांच्या विभागात द्वितीय क्रमांक मिळाला.
कराटे असोसिएशन ऑफ इंडिया वतीने आयोजित राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत अनन्या आविनाश मेढेकर इ.२ री यश गट हिला रौप्य पदक मिळाले.
प्रार्थना उमाकांत क्षीरसागर ३ री ज्ञान हिला स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले. तसेच तिला रौप्य पदक मिळाले. सिद्धार्थ उभे इ. ४ थी जय गट याला राजत पदक मिळाले.
सानिका जोशी इ. ४ थी ज्ञान गट हिला ऑलिम्पियाड बुद्धिमत्ता स्पर्धेत महाराष्ट्रातून ५ व क्रमांक मिळाला
परीक्षा
इ. ३ री ज्ञानपीठ परीक्षेमध्ये निशांत लाड ५० पैकी ५० गुण मिळवून गुणवत्ता यादीत प्रथम आला.
इ. ४ थी टि.म.वि. परीक्षेमध्ये अथर्व गडीकर व धनश्री निगडे शाळेतून प्रथम आले.
शिक्षक पालक विद्यार्ठीब संवाद कसा असावा मुलांचा व्यक्तीमहत्व विकास योग्यपद्धतीने यशस्वीपणे व्हावा. मुलांच्या समस्या उपाय या संदर्भात मा. जेऊरकर मॅडम यांच्या सहकार्याने शाळेत दि. १०/०६/२०१७ रोजी मा. राधाराजे यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सर्व शिक्षक उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
शाळेचा पहिला दिवस व स्वागत
स्वागत करतो आम्ही बलचमूंचे
बालचमुंनी सजले अंगण अभिनवचे
नवा वर्ग, नवी पुस्तके नव्या बाई
नवी संगत झाली साऱ्यांची घाई
सर्व मुलांचे स्वागत उत्साहात झाले शाळेचे आवार पताका फुगे इत्यादींनी सजवले होते. पहिल्याच दिवशी माजी मुख्या. मा. मीरा लांडगे व शाळेचे निरीक्षक मा. लता शिराळकर यांच्या हस्ते मुख्या. मा. सोनकांबळे बाई यांच्या उपस्थित सर्व मुलांना पुस्तकाचे वाटप झाले. तसेच सर्वाना खाऊ देण्यात आला शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंदाने करून सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या.
शाळेची पहिली पालकसभा
शाळा सुरु होताच उत्साहाचे वातावरण असते मुलांच्या विकासात पालकांचे सहकार्य. पालकांशी सुसंवाद महत्वाचा असतो या सुसंवादातुनच मुलांचा सर्वांगीण विकास होतो. म्हणून दि. १४/०६/२०१७ रोजी १ली ते ४ थी च्या सर्व वर्गांची पालकसभा घेण्यात आली. पालकांच्या मनात कोणतीच शंका राहू नये यासाठीच आधीच पालकसभेचे आयोजन!
शिक्षक पालक संघ
शिक्षक पालक संघ माता पालक संघ व्यवस्थापन समिती यांची सभा दि. २४/०६/२०१७ रोजी घेण्यात आली.
उल्लेखनीय
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर चिकाटीने परिश्रम करून आमचे शिक्षक स्वत:ची गुणवत्ता वाढवत आहेत. सर्व शिक्षक उच्चशिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आमचीच एक शिक्षिका सौ. रुपाली राकेश केदारी ही B.Edआपल्या आदर्श कॉलेजमध्ये केले. व तिने प्रथम क्रमांक पटकावून संस्थेचे B.Ed कॉलेजचे आपल्या शाळेचे नाव मोठे केले.
तसेच तिने सन २०१५-१७ यावर्षी टिळक शिक्षण महाविद्यालय टिळक रोड या कॉलेजमधून M.Ed ला देखील विशेष श्रेणी व प्रथम क्रमांक पटकाविला.
त्याबद्दल तिचे अभिनंदन व कौतुक ! पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा!
विविध उपक्रम:
- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनानुसार विविध उपक्रम गटकार्याचा समावेश विद्यार्थी कृतीमध्ये केला आहे व या पद्धतीने अतिशय समाधानकारक मूल्यमापन केले जात आहे
- आदर्श शिक्षण मंडळीचे संस्थापक मा. कै . तात्यासाहेब वीरकर व मा. नानासाहेब उपासनी यांच्या स्मृतीदिनी हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा हा उपक्रम घेतो
- वाचनाने मनुष्य सर्वज्ञानी होतो म्हणूनच ज्योत्सना प्रकाशनच्या सहाकार्याने पुस्तक प्रदर्शन भरविले जाते
- मराठी सप्ताह, विद्यार्थ्यांची निवडणूक घेऊन वर्गमंत्रीमंडळ, बालसभा, पालकसभा, क्रीडास्पर्धा, मराठी सप्ताह, प्लास्टिक मुक्त दिन , गुरु पौर्णिमा, शिक्षक दिन, आरोग्य तपासणी, योगा डे, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, पालखी सोहळा, वाचन प्रेरणा दिन, बालदिन, संविधान दिन असे विविध उपक्रम शाळेत राबविले जात आहेत.
- शालेय पोषण आहाराचे कामकाज अन्नपूर्णा महिला व बाल विकास सेवाभावी संस्था, कर्वेनगर यांना देण्यात आले आहे.
- इ. १ ली ते ४ थी सर्व वर्गाना स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण दिले जाते.
- इ. २ री ते ४ थी इयत्तांना संगणक प्रशिक्षण दिले जाते.
- इ. १ ली ते ४ थी च्या सर्व वर्गाना संस्कृत विषय शिकविला जातो.
- विद्यार्थी व पालकांसाठी ज्ञानरंजन ग्रंथालय चालवले जाते.
- सानेगुरुजी कथामाला अंतर्गत मुलांना छान छान गोष्टी सांगण्यासाठी व वकृत्त्व कला वाढवण्यासाठी अपर्णा निरगुडे येत आहेत.
- इ. ४ थी चे विद्यार्थी एम.टी.एस. व टि.म.वि. या बाह्य परीक्षा देत आहेत.
- तसेच इ. ३ री चे विद्यार्थी ज्ञानपीठ परीक्षा देत आहेत.
- ए.आय.ई.एल. ने यावर्षी मुलांसाठी स्पेलिंग पाठांतर, ऑब्जेक्ट टॉक यांसारख्या स्पर्धा घेऊन मुलांच्या सुप्त गुणांना वाव दिला.
- एम के सी एल आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
दरवर्षीप्रमाणे अभ्यासू, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना श्री. ज्योतिर्लिंग संस्थानच्या वतीने मदत मिळाली आहे. त्यांचे मन:पूर्वक आभार
द बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट (BCPT) यांच्यातर्फे शिक्षकांना इ. १ ली ते ४ थी इंग्रजी अध्यापनाचे प्रशिक्षण दिले गेले. त्यामध्ये इ-लर्निंग, सी.डी. मार्फत अध्यापनाचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले.
सेमी इंग्लिश, विज्ञान व गणित विषयांसाठी सीमा शिबाड व अनघा नखाते यांनी शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या. त्यांना धन्यवाद!
शाळेतील सहाय्यक शिक्षिका शिल्पा बेद्रे यांनी बी.ए. तसेच गीतांजली तांबे व सुलोचना शिंदे यांनी एम ए पदवी संपादन केली त्यांचे अभिनंदन!
जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त सेवासदन अध्यापिका विद्यालयातर्फे सौ.वैशाली नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे मनपा कडून शिक्षक दिनानिमित्त सौ. सत्वशीला खिलारे यांना शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच राष्ट्रसेवा प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त सौ. पल्लवी टपळे यांना श्री. जिव्हेश्वर विद्यावार्धक मंडळातर्फे पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात आले.
सकाळ वृत्तपत्रातील EDU प्राईम या सदरात आपल्या मा. निरीक्षक लता शिराळकर व साहा. शिक्षिका सौ.वैशाली नाईक, कविता चव्हाण, रुपाली केदारी, शिल्पा बेद्रे व नेहा उत्तेकर यांचे लेख येत आहेत.